अपयश आले तरी जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेत यश मिळवा -ॲड रोहिणी खडसे

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा, निमखेडी बु येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांच्या वाचनालयास भगिरथ अकॅडमीचे रंजन कोळंबे सर लिखित स्पर्धा परीक्षेस उपयुक्त पुस्तकांचे संच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीखडसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी ॲड. रोहिणी ताई खडसे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील युवक स्पर्धा परीक्षे कडे वळले आहेत ते जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु त्यांना योग्य ते पुस्तके उपलब्ध होत नाहीत त्यांची गरज लक्षात घेऊन आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा निमित्त स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले मतदासंघांत सात वाचनालयाना हे पुस्तकांचे संच देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील युवक स्पर्धा परीक्षे कडे वळले आहेत ते जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु त्यांना योग्य ते पुस्तके उपलब्ध होत नाहीत त्यांची गरज लक्षात घेऊन आ. एकनाथराव खडसे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मतदासंघांत सात वाचनालयाना हे पुस्तकांचे संच देण्यात येणार आहेत.

अभ्यास करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचाही सदुपयोग करावा, तसेच एखाद दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले तरी नाउमेद न होता प्रयत्न सोडू नये अपयश हि यशाची पहिली पायरी असते जिद्दीने मेहनत करुन यश मिळवा व आईवडिलांचे, आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करा असे रोहिणी ताई खडसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी माजी सभापती दशरथ कांडेलकर, पुरुषोत्तम पाटील, संजय भोलानकर, बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.

Protected Content