वीज भारनियमनाबाबत सावद्यात भाजपाचे महावितरणला निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणतर्फे आपत्कालीन भार नियमन करण्यात येत आहे. सुरू असलेले भारनियमन तातडीने बंद करण्याची मागणीचे निवेदन सावदा भाजपातर्फे महावितरण कंपनीला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण करून भारनियमनाची निश्चित अशी कुठलीही वेळ जाहीर न करता मनास येईल, त्यावेळेस शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊन वाटेल तेव्हा वीज पुरवठा सुरू करण्यात येतो. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा व सणासुदीचा काळ सुरू असल्याकारणाने होणारे आपत्कालीन भारनियमना मुळे विद्यार्थी, व्यापारी व गृहिणी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सोबतच व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत असल्याची नागरिकांची तक्रार लक्षात घेता यासंबंधी भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने याप्रश्नी आवाज उठवत महावितरण  सावदा कार्यालयात निवेदन देण्यात येऊन शहरात करण्यात येत असलेले आपत्कालीन भार नियमन तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहरात होणारे भारनियमन आज पासून कमी करण्यात आले असून येणाऱ्या काळात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री सपकाळे यांनी दिली.

 

याप्रसंगी शहराध्यक्ष जे के भारंबे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सौ सारिका चव्हाण, नितीन खारे, सचिन बऱ्हाटे, प्रतीक भारंबे, संजय चौधरी, अनिकेत परदेशी, महेश बेदरकर, चेतन नेमाडे यासह सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले उपस्थित होते.

Protected Content