पुरेशा लशी नसताना लस महोत्सव कसा ? ; राहुल गांधींकडून मोदींची खिल्ली

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लसीकरणासाठी दिवसदिवस रांगेत उभा राहावं लागत आहे. तरीही पंतप्रधान मोदींनी देशभरात लस महोत्सव साजरा करण्याचे राज्यांना आवाहन केल होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. शिवाय, पीएम केअर्स फंडबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे

 

देशात सध्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन बाधित रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे आरोग्य सेवा देखील कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणा रूग्णालयांमध्ये बेड्स, व्हेंटिलटर्स, ऑक्सिजनसह लस व इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. .

 

“ना तपासणी आहे, ना रूग्णालयात बेड, ना व्हेटिलेटर्स आहेत, ना ऑक्सिज, लस देखील नाही. केवळ एक उत्सावाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं राहुल गांदी यांनी ट्विट केलं आहे.

 

 

या अगोदर देखील राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावरून टीका केली होती. “३८५ दिवसातही कोरोनाशी लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

 

“पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होता की कोरोना विरोधातील लढाई १८ दिवसांत जिंकली जाईल. तुम्ही टाळ्या- थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइलचा लाईट देखील लावायला लावला मात्र कोरोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोकं बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा आणि जे गरीब आहेत. त्याना उत्पन्नासाठी सहकार्य करा.” असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.

Protected Content