रत्नागिरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रत्नागिरी जिल्हयात खेड तालुक्यातील तुंबाड येथील जगबुडी नदीत मित्रांबरोबर दुपारी नदीवरती पोहायला केलेल्या पाच मित्रांपैकी दोघा जणांचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २० मे रोजी सोमवारी घडली असून सौरभ हरिश्चंद्र नाचरे आणि अंकेश संतोष भागणे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, सौरभ आणि अंकेश आपल्या अन्य तीन मित्रांसोबत असे मिळून पाच तरूण तुंबाड गावानजीक वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोहायला गेले होते. सर्व मित्र आसपासच्याच गावातले होते. नदीमध्ये पाण्यासाठी उतरले असता होत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सौरभ हरिचंद्र नाचरे आणि अंकेश संतोष भागणे, हे दोन तरुण पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. इतर मित्रांनी तुंबाड गावात जाऊन ही गोष्ट कळवल्यानंतर खेड पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी गेले असता दोन्हीन्ही तरूणांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.