दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन तरूण गंभीर जखमी !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी २५ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास समोरासमोर दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दोन तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी उपस्थित असूनही, त्यांच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, ज्यामुळे जखमीला तातडीने मदत मिळाली नाही.

शिवसेना कार्यकर्त्यांची घटनास्थळी धाव
ही गंभीर बाब शिवसेना शिंदे गटाचे भुसावळ विभागप्रमुख अवि भगत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटरसायकलचा क्रमांक एम.एच.१९.डी के.०११४ असा होता, परंतु जखमी व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. अवि भगत यांनी कोणतीही वेळ न घालवता, स्वतः पुढाकार घेऊन तात्काळ रुग्णवाहिकेची सोय केली. गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीला तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आणि दोघांवर वेळीच उपचार सुरू करण्यात आले.

अवि भगत यांच्यामुळे वाचला जखमीचा जीव
या घटनेनंतर अवि भगत यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत, यापुढे असा हलगर्जीपणा दिसून आल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा जीव धोक्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे, तर अवि भगत यांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.