वढोदा गावाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण जखमी; दोघ ग्रामीण रूग्णालयात दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वाढोदा गावाजवळील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरूण जखमी झाल्याची घटना गुरूवार १४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता घडली. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अंकलेश्वर -बऱ्हाणपुर राज्यमार्गावर वढोदा गावाजवळ पल्सर दुचाकी घेऊन चोपडाकडून यावलकडे खुशाल संजय सोनवणे (वय-१८) आणि गौरव कैलास तायडे (वय-१९) दोन्ही रा. कासवा ता. यावल हे येत होते तर यावलकडून चोपडाकडे भरधाव ट्रक जात होती. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरीलदोघे तरुण जखमी झाले. दोघांना जखमी अवस्थेत शिरसाड ता. यावल येथील गणेश तायडे यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. शुभम तिडके, अधिपरीचारिका ज्योत्ना निंबाळकर, सुमन राऊत, वाय. डी. चौधरी, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content