चाळीसगावात दुचाकी लंपास ; गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील धनगर गल्लीत अज्ञात चोरट्याने घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रदीप उत्तमराव आगोणे (४१) रा. धनगर गल्ली ता. चाळीसगाव हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून ता. भडगाव येथील आदीवासी आश्रम शाळा येथे नौकरीस आहेत. दरम्यान आगोणे यांनी घरासमोर लावलेली दुचाकी (क्र. एम.एच.१९ सी.एल १९५१) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना रविवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ५-६ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. त्यावर आगोणे यांनी परिसरात शोधाशोध केली असता ३०,००० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून न आल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content