उपमहापौर गोळीबार प्रकरण; पाचवा संशयित पोलीसांना शरण

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबारप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाचवा संशयित आरोपी रामानंद नगर पोलीसांनी शरण आला आहे. 

जुगल संजय बागुल वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर, जळगाव हा रामानंदनगर पोलिसांना शरण आला आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

सविस्तर हकीकत अशी की, पिंप्राळ्यातील मयुर कॉलनी येथे २५ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास  उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उमेश पांडुरंग राजपूत, महेंद्र पांडुरंग राजपूत, भूषण बिर्‍हाडे व मंगल युवराज राजपूत सर्व रा. पिंप्राळा या चौघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत पोलिसांनी किरण शरद राजपूत तसेच जुगल संजय बागूल हे आणखी दोन संशयित निष्पन्न केले होते. २६ जुलै रोजी या गुन्हयात संशयित उमेश राजपूत व किरण राजपूत या दोघांना जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून अटक करण्यात आली होती. तर मुख्य संशयित महेंद्र राजपूत यास २८ जुलै रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास म्हसावद येथून गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकीसह अटक करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी संशयित मंगलसिंग राजपूत हा पोलिसांना शरण आला होता. अटकेतील संशयितांकडून गुन्ह्यात पिस्तोल जप्त करण्यात आले असून अटकेतील सर्व संशयित सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. गुन्हयातील तपासात निष्पन्न करण्यात आलेला संशयित जुगल बागुल हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो शरण आला आहे.

 

Protected Content