दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तीन जखमी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव जवळील बऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर आज सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील आयशानगर जहॉगीर फत्रु पटेल (वय४२ वर्ष), राजु लतीफ पटेल (वय३९ वर्ष) हे त्यांच्याकडील मोटरसायकलीने जळगावहुन यावल कडे येतांना यावल कडुन जळगावकडे जातांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक सुधाकर चोपडे (वय४९ वर्ष) यांच्याकडील मोटरसायकलने समोरासमोर धडक झालेल्याने अपघात झाला. ही घटना आज दि.९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर किनगाव गावाजवळ घडली आहे. यात तिघ जणं जखमी झाले असुन जखमींना तात्काळ घटना स्थळावरून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी.बी.बारेला व त्यांच्यासह सुर्यकांत पाटील, नाना घोडके व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक औषधपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Protected Content