राज्यात आघाडी असली तरी शहराच्या मुद्द्यांवर आंदोलने करा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील सत्तेत आघाडी असली तरी शहराच्या  मुद्द्यांवर महापालिकेपुढे आंदोलने करा , स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करा असा सल्ला आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला. 

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आले त्यांनी शहर व ग्रामीणची आढावा बैठक घेतली. बैठकीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , याबैठकीत पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षाबाबत  नाराजी व्यक्त केली. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत मित्र पक्षाची सत्ता आल्याने नागरिकांच्या समस्येबाबत आपण आंदोलन करू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. एका पदाधिकाऱ्याने महाविकास आघाडीचे पालकमंत्री असतांना आमची कामे होत नाहीत अशी व्यथा मांडली. वरिष्ठांनी स्थानिक स्तरावर पाठबळ दिल्यास जोमाने काम करता येईल असे मत यावेळी  मांडण्यात आले.  प्रशासनातील अधिकारी ऐकत नाहीत , राष्ट्रवादीच्या  पदाधिकाऱ्यांना  महत्व देत नाहीत अशा तक्रारीही काहींनी केल्या.

या सर्व बाजूंवर आपले मत मांडतांना सुरज चव्हाण  यांनी सर्वाचीच कानउघडणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य व लोककलावंतांसाठी वाढीव मानधन  मंजूर केले आहे, मात्र याची स्थानिक पातळीवरून कुठेही जाहिरात करण्यात आली नसल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून देत कानउघडणी केली.  महापालिकेत मित्र पक्षाची सत्ता असली तरी ते नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरणार असतील तर तुम्ही आंदोलन केलेच पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नाही या मुद्द्यावर  त्यांनी आपण कशा  कोणतेही पद नसताना मंत्रालयात बैठका लावल्याचे सांगितले. यातूनच अधिकाऱ्यांना योग्य तो संदेश दिला जातो असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटन मजबुतीकरणासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्तीचे भोक्ते आहेत. ते आगामी काळात जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांना बूथ कमिटीपासून सर्व  रचना अद्ययावत झालेली दाखवा असेही ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . वार्ड व बूथनिहाय कार्यकर्ता मजबूत करणे, संघटन बळकट करण्यासाठी स्थानिक परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा हेतू होता.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पक्षाने जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचे  संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. 

 

याप्रसंगी महानगरध्यक्ष अभिषेक पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील  , युवा महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे , महानगरध्यक्षा मंगला पाटील , वाय. एस . महाजन, एजाज मलिक , प्रवक्ता योगेश देसले , तुषार इंगळे, अरविंद मानकरी, कल्पिता पाटील, रोहन सोनवणे, रिझवान खाटीक, मझर पठाण, सलीम इनामदार, कासीम भाई, शेख फिरोज,   जितू चांगरे, अशोक सोनवणे, एस. एस. पाटील,  महाडिक मामा, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील,  लताताई, अर्चना कदम, उज्वला शिंदे, जुलेखा शाह, कमलताई, ममता तडवी, शकुंतलाताई, प्रशांत भाऊ  आदी उपस्थित होते.

 

Protected Content