जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश नगरातील गंगा अपार्टमेंट येथे अज्ञात माथेफिरूनी मध्यरात्री दोन वाहन जाळून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तींविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष शामलाल कुकरेजा (वय-४६) रा. गंगा अपार्टमेंट, गणेश नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांचे वास्तव्याला आहे. गुरुवार २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूंनी अपार्टमेंटच्या खाली लावलेली चारचाकी वाहन (एमएच १९ एएक्स २८१४) आणि दुचाकी (एमएच १९ एजे ७११४) यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिल्याची घटना घडली. स्थानिक रहिवाशींनी आग लागल्याचे कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत दोन्हीं वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, संतोष कुकरेजा यांनी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात माथेफिरूंवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे