मयत झालेल्या ‘त्या’ अनोळखी वृध्दाची ओळख पटली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पार्सल विभागाजवळ अनोळखी वयोवृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे पोलीसांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वृध्दाची ओळख पटली. हिम्मत रामदास सपकाळे (वय-६०) रा. वाल्मीक नगर, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पार्सल विभागाच्या नजीक असलेल्या पुलाजवळ बेशुध्दावस्थेत अनोळखी अंदाजे ६० वर्षीय वयोवृध्द आढळूल आला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले होते. त्यानुसार मंगळवारी ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मयत वृध्दाच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येवून ओळख पटविली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार करीत आहे.

Protected Content