जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी आणि सिंधी कॉलनी परिसर अश्या वेगवेगळ्या भागातून दोन बुलेट मोटारसायकल चोरीचा गुन्ह्यांची उकल एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. यात दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील बाबा कॉलनीतून १३ नोंव्हेबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकीची बुलेट (क्रमांक MH-19 CH-4898) त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी झाली होती. या प्रकरणी नाकपाल यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार पोना किशोर पाटील यांना सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करून गोपनीय बातमीच्या आधारे संशयित जावेद शेख चांद, रा. मास्टर कॉलनी, अदनान अमजद खान रा. शाहुनगर जळगाव यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिस कोठडीत असताना दोन्ही संशयितांनी बुलेट क्र. MH-19 CH 4898 ही सिंधी कॉलनी बाबा नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दिसत असल्याने आरोपी जावेद शेख चांद याची पुन्हा 02 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी रिमांड घेतली. रिमांड दरम्यान त्याने पुन्हा एक काळ्या रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बुलेट सुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास किशोर पाटील करीत आहेत.