जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणारे दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी आज मंगळवारी दुपारी अटक केली असून दोघांकडून चोरीच्या चार दुचाक्या हस्तगत केले आहेत. तर मुख्य संशयित आरोपी फरार आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात शहरातील पाचही पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या रेकार्डवरील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवडे रा. मेहरूण ता.जि.जळगाव हा दुचाकींची चोरी करून तालुक्यातील चिंचोली गावातील गोपाल राजेंद्र पाटील आणि विशाल मधुकर इखे यांच्या मार्फत गावातील लोकांना विक्री केली असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पथक तालुक्यातील चिंचोली गावात जावून गोपाल पाटील आणि विशाल इखे या दोन्ही संशयित आरोपींना आज मंगळवारी सापळा रचून अटक केली. त्यांनी चिंचोली गावात विक्री केलेल्या चार दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्ष रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गफार तडवी, पोना. मिलींद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील यांनी केली. दोन्ही संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित आरोपी मुकुंदा सुरवाडे हा फरार आहे.