मास्क, हेल्मेट न वापरणार्‍यांवर कारवाई; वरखेडीजवळ चार चाकी वाहनांची तपासणी

पाचोरा  – पाचोरा-जामनेर रस्त्यावर वरखेडी गावाजवळ मास्क न लावणार्‍या आणि हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकी धारकांवर पोलीस प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान चार चाकी वाहनांचीही तपासणी करण्यात आली.

 

पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशानुसार, पाचोराचे डीवायएसपी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे पीएसआय लीलाधर कानडे यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाचोरा जामनेर रस्त्यावर वरखेडी गावाजवळ नाकाबंदी करत तोंडाला मास्क न लावता फिरणार्‍या 7 जणांवर तसेच हेल्मेट न वापरणार्‍या 150 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच चार चाकी वाहन चालवतांना सिट बेल्ट न वापरणार्‍यांवर व मालवाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पंचक्रोशीतील जनतेतून समाधान व्यक्त अश्या कारवाया सातत्याने होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. बरेचसे वाहनधारक वाहतूकीचे कोणतेही नियम पाळत नसून भरधाव वेगाने वाहने पळवतात. तसेच अल्पवयीन मुलेही वाहने चालवतात याला पायबंद बसेल व अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यांनी केली कारवाई

मंगळवारी दिवसभर पोलीस प्रशासनातर्फे वाहनांची कसून तपासणी केली जात होती. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना नियमांची आठवणही करून दिली जात होती. ही कारवाई पीएसआय डीगंबर थोरात, पो.हे.कॉ. रणजित पाटील, विजय माळी, अरुण राजपूत, संदीप राजपूत व दिपक पाटील यांनी केली.

Protected Content