दोन ट्रक चालकांना जखमी करून लुटणाऱ्या चोरट्यास अटक

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दोन ट्रक चालकांना गंभीर जखमी करून लूट करणाऱ्या चोरट्यास अवघ्या दोन तासात पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला, लूट आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याविषयी अधिक माहिती अशी की, “ ट्रक चालक नंदूसिंग धनसिंग महेर रा वादीखुर्द ता भोकरदन जि जालना हे ट्रक मालक मंगलसिंग फुलसिंग राजपूत रा बोरगाव बाजार ता सिल्लोड जि. औरंगाबाद यांच्यासोबत भरुच, गुजरात येथून मीठ भरून मेहकर येथे येत होते. दरम्यान धुळे ते पारोळा दरम्यान विचखेडाजवळ ट्रक पंचर झालेने टायर खोलत असतांना दि २७ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजेच्यादरम्यान धुळेकडून एक मोटर सायकलस्वार आला व म्हणाला की, “मुझे जळगाव जाना है, मै धुलियासे आया हु, रातका टाइम है, मुझे डर लगता है.” असे म्हणून थोडावेळ तेथेच थांबला; त्यानंतर त्याने त्याच्या जवळील रामपुरी चाकू काढला व म्हणाला की, “मला 500 रुपये द्या.” तेव्हा ट्रक मालक मंगलसिंग यांनी त्यांचे जवळील ८०० रुपये काढले असता ते सर्व रुपये त्या मोटर सायकलस्वाराने मगितलेन. मंगलसिंग यांनी ते देऊन टाकले. त्यानंतर ड्राइवर नंदूसिंग यांच्या गळ्यातील चांदीची चैन दिसली. तीही त्याने जबरीने मगितली. नंदूसिंग यांनी चांदीची चैन व मोबाईल घाबरून देऊन टाकला त्यानंतर चोरटा निघून गेला व परत येऊन मोबाईलचा पॅटर्न लॉक खोलून मागितला.

यावेळी नंदूसिंग यांनी पॅटर्न लॉक न सांगता त्यांचा आरोपीने घेतलेला मोबाईल हिसकावून घेतला. आरोपीने त्याच्याजवळील चाकूने नंदूसिंगच्या उजवे बोटाच्या अंगठ्यास गंभीर जखमी केली व आणखी मारण्याचा प्रयत्न करीत असता ट्रक मालक मंगलसिंग यांनी चोरास मागून पकडले. चोरट्याने मंगलसिंग यांचे पोटात चाकू खुपसत प्राणघातक हल्ला केला. यात मंगलसिंग गंभीर जखमी झाले तेव्हा नंदूसिंग यांनी स्वतःचा बचाव करणेकरिता लाकडी ठोकळा आरोपीच्या तोंडावर मारला असता आरोपी जखमी होऊन पळून गेला.

नंदूसिंग यांनी ११२ नंबर डायल कॉल केला. तात्काळ रात्रगस्तचे API निलेश गायकवाड, ASI उदयसिंग साळुंके,  पो हे कॉ किशोर पाटील, पो कॉ किशोर भोई, होमगार्ड चेतन पाटील घटनस्थळी पोहचले आणि कुटीर रुग्णालय येथे दोन्ही जखमींना आणले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना खबर देताच हॉस्पिटल येथे पोहचून जखमींची विचारपूस केली. अनोळखी चोरट्याने वर्णन विचारले व तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. API निलेश गायकवाड, PSI राजू जाधव, PSI शेखर डोमाले रात्रगस्तचा सर्व स्टाफ व डीबीचे कर्मचारी यांना तात्काळ बोलावून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासाचे चक्र फिरविले.

तीन पथक तयार करून एक पथक घटनास्थळी व पारोळा येथे व दोन पथक एरंडोल व जळगावच्या दिशेने तात्काळ रवाना झाले.

पारोळा माथा येथे एक ट्रक उभा दिसला त्या ट्रक चालकास विचारपूस केल्यावर ‘टायर पंचर झाले असून एका व्यक्तीने मोटर सायकलवर येऊन चाकू दाखवून १०० रुपये जबरीने घेतले. तो जळगावकडे गेला असून त्याचे डोक्यास जखम झालेली दिसली.’ असल्याचे सांगितले.

एरंडोल, जळगावकडील सर्व धाबे, पेट्रोलपंप चेक करीत जात असता सावखेडा होळ येथे टँकरच्या कॅबिनमध्ये ड्राइवर झोपलेले असताना त्या कॅबिनमधून मोबाईल व चार्जर कोणीतरी चोरून नेले असे समजले. त्या टँकरमधील ड्राइवरला सोबत घेऊन बी बी भार्गव येथील पेट्रोल पंप येथे विचारपूस केल्यावर ‘डोक्यास जखम असलेल्या व्यक्तीने १०० रुपयांचे पेट्रोल भरले असे सांगितले. त्या ठिकाणी रक्तसुद्धा सांडलेले दिसले. CCTV फुटेज हस्तगत केले.

असता तिसरे पथक सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले व जिल्हापेठ व एरंडोल पोलिसांशी संपर्क करत माहिती दिली. MIDC  चे PSI गिरासे व स्टाफ आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे हे कॉ तुषार जावरे यांची मदत घेऊन आरोपीचा पारोळा पथक API गायकवाड, PSI जाधव व स्टाफ शोध घेत असतांना इच्छादेवी चौकीजवळ डोक्यास जखम असलेला एक व्यक्ती दिसला.

त्यास ताब्यात घेतले व फुटेज मधील व्यक्तीचे साम्य दिसले व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल (HF DELUX MH 18 AQ 0754)  आरोपीजवळच असलेली मोटर सायकल व आरोपीचा फोटो काढून नंदूसिंग यांना दाखविल्यावर खात्रीपूर्वक ओळख झाल्यावर मोटर सायकल, जबरीने चोरलेले ९०० रुपये व रक्ताने भरलेला चाकू मिळून आला.

आरोपी फिरोज इकबाल शेख रा. १०० फुटी रोड धुळे, मूळ रा जळगाव तांबापुरा यास गुन्ह्यात अटक करण्यात आली. टँकरच्या कॅबिन मधून चोरलेला मोबाईलसुद्धा आरोपीकडे मिळाल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक व मालक याना प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यानेही गुन्हा दाखल करून नमूद आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करण्यात आली.”

आरोपीवर MIDC पो स्टे, नशिराबाद पो स्टे, रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोरीचे व इतर गुन्हे दाखल आहेत. ADD SP रमेश चोपडे, DYSP राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, API निलेश गायकवाड, PSI राजू जाधव, PSI शेखर ढोमाळे, साळुंके, कॉ किशोर पाटील, हे कॉ सुधीर चौधरी, पो ना संदीप सातपुते, पो कॉ किशोर भोई, पो कॉ अभिजित पाटील, पो कॉ नरेंद्र पाटील, होमगार्ड चेतन पाटील यांनी हि कामगिरी केली.

Protected Content