समता नगरात घरफोडी; बांधकामाच्या साहित्यासह ५० हजाराची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । मुलीकडे गेलेल्या परिवाराचे बंद अज्ञात चोरट्यांनी फोडून बांधकामाच्या दोन मशिनसह ५० हजाराची रोकड लांबविल्याची घटना समता नगरात आज सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, करन रसाल चव्हाण वय 49 रा. रामदेवबाबा टेकडी, समतानगर हे पत्नी ललीता, मुलगा दुर्गेश व नागेश या परिवारासह राहतात. 6 नोव्हेंबर रोजी करन चव्हाण हे परिवारासह हे इंदोर येथे मुलगी पल्लवी हिची प्रसूती झाल्याने तिच्या भेटीसाठी गेले होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास इंदोरहून चव्हाण कुटुंबिय परतले. घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व दरवाजाला कडी लावलेली होती. घरात पलंगावरील गादीसह, लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेला दिसून आला. तसेच लोखंडी पेट्याचेही कुलूप तुटलेले दिसून आले. तपासणी केली असता, यात लाकडी कपाटात ठेवलेले 50 रोकड तसेच घरातील बांधकामाच्या दोन कटर मशीन, असा चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले. चोरट्यांनी चोरी करुन परततांना घरातील एलईडी टीव्हीला दगड मारुन त्याचेही नुकसान केल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यानंतर करन चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकार कळविला. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांनी पाहणी केली. याप्रकरणी करन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रत्ना मराठे हे करीत आहेत.

Protected Content