पॉपर्टीवर बोजा व नोटीस पाठविल्याच्या कारणावरून बँक मॅनेजरला दमदाटी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कर्ज काढल्याने प्रॉपर्टीवर बोजा लावल्याच्या रागातून जळगाव शहरातील रिंगरोड येथील जेडीसीसी बँकेच्या मॅनेजरला एकाने शिवीगाळ करत दमदाटी प्रकार शनिवार १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मंगलसिंग नागो सोनवणे (वय-६०) रा. मुक्ताईनगर कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते रिंग रोडवरील जेडीसीसी बँकमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात.  दरम्यान, बँकेतून सुरेश बन्सीलाल जैन राहणार पोलन पेठ, जळगाव यांनी कर्ज काढले होते. वेळेवर कर्ज फेडले नाही म्हणून मॅनेजर मंगलसिंग सोनवणे यांनी सुरेश जैन प्रॉपर्टीवर बोजा लावला आणि त्याबाबत त्यांनी नोटीसही दिलेली होती. पॉपर्टीवर बोजा लावला आणि नोटीस दिल्याचा राग आल्याने सुरेश बन्सीलाल जैन याने शनिवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता बँकेत येऊन मॅनेजर मंगलसिंग सोनवणे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर मॅनेजर मंगलसिंग सोनवणे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित सुरेश जैन यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content