रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणी घरात एकटी असतांना एकजण घरात घुसल्याने त्याला हटकले. या रागातून तरूणीसह दोन जणांवर विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना कर्जोद येथे घडली आहे. याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योत्स्ना राजकुमार ससाणे रा. कर्जोद ता. रावेर ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १ जून रोजी तरूणी एकटी घरात असतांना त्याच गावात राहणारा अनिल रमेश ससाणे (वय-२९) हा घरात घुसला होता. अनिल घरात आल्याचे पाहून तरूणीने त्याला शिवीगाळ करून हाकलून दिले. याचा राग असल्याने अनिल ससाणे याने लोखंडी विळ्याने वार करून तरूणीला जखमी केले व जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील रमाबाई रविंद्र सासणे आणि गौतम गिरधर ससाणे हे आवरण्यासाठी आले आसता त्यांना देखील जखमी केले आहे. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल रमेश ससाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.