सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण केल्याने जावाई गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील कुसुंबा येथे राहत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावायाला कुऱ्हाडीसारख्या लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश शांतीलाल पाटील (वय-३३) रा. उंदिरखेडा ता.पारोळा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. योगेश पाटील व त्यांची पत्नी यांच्या गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे माहेरी मुलासह निघून आलेली होती. दरम्यान, शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता योगेश पाटील हा त्याचा मित्र याच्यासोबत मुलाला भेटण्यासाठी कुसुंबा येथे आलेला होता. त्यावेळी योगेश पाटील यांना त्याचे सासरे विकास नथ्थू चोपडे, शालक विशाल विकास चोपडे आणि माम सासरे प्रविण यांनी शिवीगाळ करत कुऱ्हाडीसारखी लोखंडीन वस्तूने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्या मारहाणीत खिश्यातील दोन मोबाईल आणि रोकड गहाळ झाले. याप्रकरणी रविवारी २२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Protected Content