जळगावात राष्ट्रीय लोक अदालत ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आज शहरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून यात विविध खटल्यांमध्ये तडजोड करण्यात आली आहे.

आज देशभरात लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने जळगावातही याचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यात एकूण ४४६४ प्रलंबीत खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आली असून यासोबत ३१०८३ वादपूर्व खटल्यांवरही सुनावणी झाली. अर्थात, जिल्ह्यात ३५,५४७ एकूण खटल्यांवर सुनावणी घेण्यात आली. यात दोन्ही बाजूंना बोलावण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये करण्यात आलेल्या निकालांना न्यायालयाचा दर्जा असून याबाबत नंतर दाद मागता येत नाही. देशातील लक्षावधी खटले हे वर्षानुवर्षे चालत राहतात. यामुळे दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन लोक अदालतीमध्ये दोन्ही बाजूंना बोलावून सामोपचाराने वाद मिटवण्यात येतात. यात भूसंपादन, दिवाणी, बँकींग, इंटरनेट सेवा पुरवठादार, मोबाईल कंपन्या आदींशी संबंधीत वादांची संख्या सर्वाधीक असल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी.ए. सानप यांनी दिली.

पहा : राष्ट्रीय लोक अदालतीबाबत माहिती देणारा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content