गोहत्या प्रकरणात दोन जणांना जमावाकडून बेदम मारहाण, एकाची प्रकृती गंभीर

सोलापूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोहत्याच्या कारणावरून दोन जणांना जमावाकडून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोलापूर तालुक्यात घडली आहे. या मारहाणीत एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांसह गोहत्या करणाऱ्यांविरोधात गुनहा दाखल करण्यात आला आहे.

गुडूलाल मशाक शेख (वय 39 वर्ष) आणि सिराज नजीर पटेल या दोघांना जबर मारहाण करण्यात आली आहे. जखमी गुडूलाल यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार १ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ते सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील त्यांच्या शेतात आले होते. त्यावेळी तेथे गावातील काही तरुण आले आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब विचारत शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी गुडूलाल व सिराज पटेल यांना लाकडाने व लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्या डोक्यात खोलपर्यंत जखमा झाल्या आहेत.

या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात सोळा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगमेश्वर महादेव बम्मंणगे, पंचनाथ चंद्रकांत दिंडुरे, बसवराज नागनाथ बोरेगाव, राकेश सुभाष मुगळे, संतोष हणमंत माळी, सचिन शामराव सासवे, बसवराज प्रभू पिशानतोट, शुभम दिंडुरे, विजय कापसे, महेश बोरुटे, बाबूराव हडपद, सागर अडवीतोट, उमेश बम्मंणगे, सिद्राम अमाती हदरे, पंचनाथ क्षेत्री, राजू क्षेत्री अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

गोहत्या करणाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल : यात गुडूलाल मशाक शेख, सिराज नजीर अहमद पटेल, असिफ दौलत बागवान, जब्बार सलाउद्दीन काजी, सैपन सलाउद्दीन काजी आणि जहीर बशीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content