तीन दिवसात साईंचरणी सात कोटींचे दान !

शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साई बाबांना गुरू मानत साईभक्तांकडून गुरूदक्षिणा म्हणून भरभरून दान देण्यात आले आहे. यावेळी गुरूपौर्णिमा उत्सवात २ लाखा भाविकांनी साई समाधींचे दर्शन घेतले. तीन दिवसांच्या उत्सवाच्या काळात साईभक्तांकडून ७ कोटी ३ लाख रूपयांची देणगी दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

अशी मिळाली देणगी
रोख स्‍वरुपात – २ कोटी८५ लाख ८८२ दक्षिणा पेटीत प्राप्‍त
देणगी काऊंटर – १ कोटी १५ लाख ८४ हजार १५० रूपये
साई प्रसादालय देणगी – २ लाख ८४ हजार ९४६ रूपये
व्हीव्हीआयपी सशुल्‍क पास देणगी – ६७ लाख ३३ हजार ८०० रूपये
डेबीट क्रेडीट कार्ड – ५६ लाख ८३ हजार १३३ रूपये
ऑनलाईन देणगी – ६४ लाख ५ हजार ७८ रूपये
चेक डी.डी.देणगी – ८० लाख ७४ हजार ८२० रूपये
मनी ऑर्डर – २ लाख ९ हजार ५ रूपये
सोने ४७२.३०० ग्रॅम रक्‍कम रुपये – २५ लाख ७२ हजार २९७ रूपये आणि
चांदी ४ किलो ६७९ ग्रॅम रक्‍कम रुपये- २ लाख ६६ हजार रूपये प्राप्त झाले आहे.

मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप : गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणता २ लाखहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे १ लाख ५४ हजार ९४६ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत १ लाख ८८ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला.

Protected Content