भरधाव कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून भुसावळकडे जात असताना रस्त्यावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या संदर्भात रविवारी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रहीम बलदार तडवी आणि त्यांचा मित्र सलमान खान कादर खान दोन्ही रा. शाहू नगर जळगाव हे २० जून जून रोजी ७.३० वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडब्ल्यू ८३१५) ने जळगाव येथून भुसावळकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावरील नशिराबाद येथील टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ इए ८५४४) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रहीम बलदार तडवी आणि त्याचा मित्र सलमान खान कादिर खान हे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. दोघांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात रहीम तडवी यांचा भाऊ रवींद्र तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील चालक तुषार पाटील यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे करीत आहे.