अतिक्रमण काढण्यावरून महिलेसह दोघांना मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावात अतिक्रमण काढण्यावरून महिलेसह इतरांना धारदार वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तर महिलेच्या घरातील सामानांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की, सखुबाई भगवान पाटील (वय-५२) रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून गावात राहणारा अनिल शिवनारायण पाटील याच्यासह इतरांनी शिवीगाळ करून चाकूने वार करून सखुबाई भगवान पाटील, पंडित किसन पाटील तुषार भगवान पाटील या तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. तर महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत गाळ होवून घरातील सामानांची नासधुस केली आहे. या मारहाणीत महिलेच्या शेजारी  राहणारे बादल पाटील यांच्या मालकीची कार क्रमांक (एमएच १२ व्हीएल १२४१) कारच्या फोडून नुकसान केले आहे. या घटनेबाबत रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सखुबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल शिवनारायण पाटील, टिकाराम रामचंद्र पाटील, तुषार रवींद्र पाटील, प्रशांत रमेश पाटील, नगराज भरत पाटील, मयूर शांताराम पाटील आणि दिनेश शरद पाटील सर्व रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहे.

Protected Content