धरणगाव तालुक्यात आज आढळले ४२ कोरोनाबाधित !

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात ४२ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण ४२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात धरणगाव शहरात १९ तर उर्वरित तालुक्यात २३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाळधी खुर्द-६, पाळधी बुद्रुक-४,अहिरे-,बोरगाव बु-८, बोरगाव खु-२, पष्टाने-१,एकलग्न-१ तर धरणगाव शहरातील हेडगेवार नगर-३,पाताल नगरी-१, सराया मोहल्ला-१,परिहार चौक-४,खत्री गल्ली-२,बेलदार मोहल्ला-१,धनगर गल्ली-४, मातोश्री नगर-१,जि.एस.नगर-१, पारधी वाडा-१, असे एकूण तालुक्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धरणगाव तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ७०३ झाली असून यापैकी ३४ जणांचा मृत्यू तर ४९१ जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित १७८ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content