सचिन पायलट यांनी घेतली राहुल आणि प्रियंका गांधींची भेट ; लवकरच वाद संपुष्टात येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची नुकतीच भेट घेतली आहे. पायलट यांनी फोन काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधत भेटीसाठी मागितली वेळ मागितला होता. या भेटीनंतर राजस्थानातील सत्ता संघर्ष वाद संपुष्टात येईल, असे बोलले जात आहे.

 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेद टोकाला गेल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अचानक बंड पुकारले होते. सचिन पायलट यांनी आपल्या १८ आमदारांसह जयपूर सोडले होते. त्यानंतर महिनाभरापासून राजस्थानातील संपूर्ण घडामोंडीवर सचिन पायलट हे मौन बाळगून होते. परंतू त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी संपर्क साधला असून, भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचीही संपर्कात असून काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू कळते. दरम्यान, यावर अद्याप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Protected Content