जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बालाजीपेठ परिसरातून एका वृध्दाच्या उघड्या घरातून १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ओंकार सोनवणे वय २० रा. रिधूरवाडा ता. जळगाव असे संशयित चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप कन्हैय्या प्रजापती वय ६२ रा. ओम नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे बालाजी पेठमधील ओम नगरात जूने घर आहे. त्याठिकाणी ते जेवन करून आराम करण्यासाठी जात असतात. दरम्यान, ते दरवाजा उघडा करून पलंगावर झोपलेले असतांना संशयित आरोपी ओंकोर सोनवणे याने घरात घुसून घरात ठेवलेले १३ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ३.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.