बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मलकापूर शहराजवळ महामार्गावर दोन लक्झरी बसच्या झालेल्या अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले असून सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
मलकापूर शहराजवळच नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सात प्रवासी ठार झाले असून २५ ते ३० प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आज पहाटे पावणेतीलन वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच ०८-९४५८) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच २७ बिएक्स ४४६६) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना झाली होती.
दरम्यान, अपघातानंतर दोन्ही गोष्टी समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाले आहेत. तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण ५ प्रवासी गतप्राण झालेत तर २ प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणल्यानंतर दगावले. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.