Home क्राईम विहीरी पडल्याने अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

विहीरी पडल्याने अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार ४ जुलै रोजी उघडकीला आली आहे. या संदर्भात पाहून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धीरज नारायण पवार वय-१७, रा. टाकळी ता. जामनेर असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धीरज पवार हा जामनेर तालुक्यातील टाकळी गावात वास्तव्याला होता. दरम्यान ४ जुलै रोजी दुपारीच्या सुमार तो शेतात गेलेला असताना त्याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound