हातभट्टी उद्ध्वस्त : दारू विक्रेता फरार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री शिवारात हातभट्टीवर धाड टाकून उदध्वस्त करण्यात आली असून यातील संशयित मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

 

यावल यात गावठी हातभट्टी व पन्नीची घातक दारूच्या होत असलेल्या विक्रीच्या विरोधात सर्वपक्षीय निवेदनाची दखल घेत पोलीसांनी दारू विक्रत्यांच्या विरोधात कारवाई सुरूवात केली आहे. यात पोलीसांनी पिंप्री शिवारात एक भट्टी उद्धवस्त करून कारवाई केली आहे .       पंकज हिरामण सपकाळे ( फरार संशयीत ) हा पिंप्री तालुका यावल येथील यावल शिवारातील गावाजवळ स्मशानभुमीच्या मागे सार्वजनिक ठिकाणी दिनांक २८ जुलै रोजी गावठी हातभट्टीची दारू पाडण्याचे सुमारे १७ हजार रुपये किमतीचे विविध दारू पाडण्याचे रसायन व प्लास्टीकचे ड्रम तसेच विविध साहित्यसह पोलीसांनी गैर कायद्याशीर भट्टी रचुन दारू करण्याच्या तयारीत दिसून आला.

 

या भट्टीवर पोलिसांनी धाड टाकून सामान जप्त केला. तर या  धाडीत संशयीत पंकज सपकाळे हा त्या ठिकाणाहुन पळवुन जाण्यात यशस्वी झाला.

 

या बाबत पोलीस कॉस्टेबल निलेश वाघ यांनी फिर्याद दिल्याने सिसिटीएनएस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम१९४९चे कलम ६५प्रमाणे ( फ), ( ब ) (क ) ( ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ कैलास परदेशी हे करीत आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील तालुक्यात बेकायदेशीर तयार करून सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विक्री होत असलेल्या हातभट्टी व पन्नीच्या विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Protected Content