फैजपूर येथे प्लॉट खरेदी विक्री वादातून दोन जणांना बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंपरूळ फाट्याजवळ प्लॉट खरेदी विक्रीच्या करणावरून पाच जणांनी दोन जणांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गरबड सपकाळे (वय-२७) रा. कोळीवाडा ता. यावल हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. अनिल सपकाळे यांचा भाऊ अजय गरबड सपकाळे यांना मनोज रामदास कापडे रा. बाहेरपेठ फैजपूर ता. यावल याने १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पिंपरूड फाट्यावर बोलावून प्लॉटच्या जागेच्या व्यवहारावरून शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पुन्हा साडे सहा वाजता पिंपरूड फाट्याच्या जवळ मनोज कापडे याने विट भट्ट्याजवळ अनिल सपकाळे यांना ‘तू आमच्या भांडणात का बोलते’ असे बोलून सोबत असलेले सुकदेव रामदास कापडे, जितू सुकदेव कापडे, प्रल्हाद रामदास कापडे आणि तुषार प्रल्हाद कापडे सर्व रा. बाहेरपेठ फैजपूर ता. यावल यांनी मिळून मारहाण केली. यातील जितू कापडे याने हातातील लोखंडी रॉड अनिल सपकाळे यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तसेच मनोज कापडे व सुकदेव कापडे यांनी विटा मारून फेकल्या. तर अजय सपकाळे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून विटा मारून फेकल्या. संशयित आरोपी मनोज याने अजय सपकाळे यांना “जीवंत सोडणार नाही, तुला घरी येवून मारून टाकेल” अशी धमकी दिली. याप्रकरणी अनिल सपकाळे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम १४३, १४७, ३२३, १४९, ३२६, ५०४ प्रमाणे संशयित आरोपी मनोज रामदास कापडे , सुकदेव रामदास कापडे, जितू सुकदेव कापडे, प्रल्हाद रामदास कापडे आणि तुषार प्रल्हाद कापडे सर्व रा. बाहेरपेठ फैजपूर ता. यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

Protected Content