जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवर मध्यरात्री दीड जेच्या सुमारास दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोन्ही गटातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मोहाडी रोड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दीड जेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीची गस्त घालत असतांना हॉटेल मराठा गार्डन समोर दोन गटात वाद घालून झोंबाझोंबी करीत होते. यावेळी दोन्ही गटांकडून जोरजोरात आरडाओरड करुन व शिवीगाळ करीत शांतता भंग करीत असल्याचे पोलीसांना दिसून आले.
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटातील बापू संतोष सपकाळे (वय-४१), मयूर राजाराम कुऱ्हाडे (वय-३१) दोघ रा. वाघनगर, दिगंबर पुंडलीक पोहरे (वय-५७) रा. समता नगर, शशीकांत प्रकाश राजपूत (वय-२९) रा. हॉटेल मराठा गार्डन, रवींद्र गणपत मराठे (वय-४७), संजय गणपत मराठे ( वय-४६), संदिप पांडूरंग माळी (वय-४६) तिघे रा. नेहरुनगर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.