राज्य मंत्रीमंडळाची बैठक : आज झाले ‘हे’ निर्णय

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली असून यात विविध खात्यांशी संबंधीत निर्णय घेण्यात आले. तथापि, यात ओबीसी आरक्षण, निवडणुका पुढे ढकलण्यासह एसटी कर्मचार्‍यांना मेस्मा लावण्याच्या निर्णयांचा समावेश नाही.

आज ८ डिसेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यात खालील निर्णयांचा समावेश आहे.

* नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

* कोविड १९ पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार.
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

* महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)

* महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम- २ (स) (र्ळीं) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ (वर) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)

* बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा (पणन विभाग)

* शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Protected Content