एमआयडीसीतील के सेक्टरमधील मोकळी जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहित

 

जळगाव : प्रतिनिधी ।  कोरोनाबाधित  मृतांची संख्या वाढत असल्याने आता एमआयडीसीतील के सेक्टरमधील मोकळी जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहित करण्याचे आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत

 

 

कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा राज्यात १३ मार्च २०२० पासून लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख घोषित झालेले आहेत  त्याचप्रमाणे साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ पण राज्यात लागू आहे या कायद्यांनी मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अहिजीत राऊत यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की , शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत सध्या अंत्यविधीसाठी २४ ओटे आणि १ गॅसदाहिनी आहे  ही व्यवस्था कोरोनाअधिक मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कमी पडते आहे त्यामुळे महापालिका अधिनियम कलम ३२१ नुसार या मृतांच्या अंत्यविधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात एमआयडीसीच्या अखत्यारीतील व शहराच्या जवळच्या भागातील एमआयडीसी के  सेक्टर मधील १५००   चौरस मीटर्स क्षेत्रफळाचा खुला भूखंड ( १० / ८१७२८ ) यापुढच्या ६ महिन्यांच्या कालावधीसाठी अधिग्रहित करण्यात  आला  आहे  आता या ठिकाणी अंत्यविधी नोंदी ठेवणारे कर्मचारी , आवश्यकतेनुसार ओटे , कुंपण  , अग्नी सुरक्षा व्यवस्था , पाणी आणि तात्पुरते शेड व पुरेसा लाकूड पुरवठा अशा सुविधा महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे . या आदेशाची माहिती जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे .

 

 

Protected Content