जिल्ह्यात आज ३८५ कोरोना पॉझिटीव्ह; जळगाव व एरंडोलमध्ये रूग्ण संख्येचा स्फोट

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ३८५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगावात सर्वाधीक ७३ तर एरंडोलमध्ये ७१ पेशंट आढळून आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर रूग्णांची संख्यादेखील वाढली असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टबाबत जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट जारी केले आहे. यानुसार आज जिल्ह्यात तब्बल ३८५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक जळगाव शहरातील ७३ रूग्ण आहेत. तर याच्या खालोखाल एरंडोल तालुक्यात तब्बल ७१ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता- जळगाव ग्रामीण-१४; भुसावळ-१८; अमळनेर-३८; चोपडा-३२; पाचोरा-३२; भडगाव-७; धरणगाव-३८; यावल-४; जामनेर-३२;रावेर-३; पारोळा-४; चाळीसगाव-१५; बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील २ असे रूग्ण आढळले आहेत.

जळगाव शहरात वाढलेला संसर्ग मध्यंतरी थोडा कमी झाला होता. तथापि, आज यात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर हाच प्रकार एरंडोलमध्येही आढळून आला आहे. मध्यंतरी येथे काही दिवस खूप कमी प्रमाणात पॉझिटीव्ह रूग्ण होते. मात्र आज तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content