Home क्राईम मटका व जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; दोघांना अटक

मटका व जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; दोघांना अटक

0
103


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील महापालीकेच्या सेामाणी मार्केटमध्ये कल्याण मटका व जुगार खेळला जात असल्याच्या माहिती वरुन रामानंदनगर पेालिसांनी छापा टाकून दोन सट्टा बुकींना अटक केली आहे. त्यांच्या जवळून रोखरक्कम व साहित्य जप्त करुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळा येथील सेामाणी मार्केट परिसरात सट्टा सुरु असल्याच्या गुप्त माहितीवरुन पेालिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, विजय खैरे, भुषण पाटील, होमगार्ड तुषार नेवे अशांच्या पथकाने छापा टाकला . मिळालेल्या माहित प्रमाणे, दुपारी दिडच्या सुमारास दोन बुकी कल्याण मटका प्रकाराच्या सट्ट्याची बुकींग घेतांना आढळून आले. पथकाने जनराज बन्सी भोई (वय-४४, रा.गांधी चौक), संभाजी श्रीपत सैंदाणे (वय-७५, रा.मयुर कॉलनी) असे ३ हजार ३२० रुपये रेाख सट्टा जुगाराचे साहित्य पेालिसांनी जप्त केले असुन संशयीतांच्या विरुद्ध मुंबई जुगार ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होवुन अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound