प्रवासी वाहतुकीच्या वादातून पहूर बस स्थानकावर दोन गटात हाणामारी

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी | पहुर बस स्थानक परिसरात आज सकाळी अवैध प्रवासी वाहतूकीच्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “जळगावहून औरंगाबादकडे जाणारी ‘खाजगी लक्झरी बस’ पहूर बस स्थानकावर थांबली असता अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी ओमनीमध्ये बसलेले चार प्रवासी उतरून लक्झरी गाडीत बसले. या कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक सुरू होऊन चकमकीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.

या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक चेडे, व त्यांचे सहकारी भरत लिंगायत, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, सानप दादा, अनिल राठोड घटनास्थळी पोहोचले. पी.आय.अरुण धनवडे यांनी जमावाला शांत राहण्यास सांगितले. पहुर बस स्थानक परिसरात अतिक्रमित अवैध प्रवासी वाहतूक गाड्या हटविण्यात आल्या.

दरम्यान दोन गटात झालेल्या या तुंबळ हाणामारी प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला आरोपी तौसिफ शब्बीर शेख (वय 20 राहणार अजिंठा जिल्हा औरंगाबाद), अल्ताफ रऊफ शेख (वय 26), कलीम रऊफ शेख (वय 28), अकबर रऊफ शेख (वय 24), फजल शईद शेख (वय 22), गोलु ऊर्फ रऊफ शेख (वय 18) गणेश गुलाब बैरागी (वय 22 रा. कासमपुरा जळगाव), चेतन सुधाकर पाटील (वय 19), सचिन सुधाकर पाटील (वय 22) आणि किशोर समाधान पाटील (वय 25) सर्व राहणार हनुमान मंदिराजवळ पहूर पेठ तालुका जामनेर यांच्यावर पोलीस ज्ञानेश्वर ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण धनवडे आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!