जळगाव,प्रतिनिधी |श्री गणरायांचे विसर्जन मिरवणुकीत दंग गणेशभक्तांच्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी लांबविल्याच्या घटना शनिवारी समोर आल्या आहे. एका दुचाकीची नेहरु चौक आयडीबाय बँकेच्या एटीएमजवळून तर दुसरी दुचाकी गोलाणी मार्केट जुनी शिरपूर बँकेजवळून चोरी झाली आहे. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने दोघे तक्रारदारांनी शनिवारी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
अशोक गिरधर चौधरी हे कुटुंबासह कोल्हेनगर परिसरात वास्तव्यास आहेत. ते जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचा मुलगा भुषण चौधरी हा गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी १२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरात आला. यावेळी त्याने त्यांची पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा दुचाकी (क्र एम.एच १९ बीडब्लू ९१४०) ही गोलाणी मार्केटजवळील जुनी शिरपूर बँकेजवळ रस्त्याजवळ पार्किंग केली. मिरवणुक पाहून आल्यानंतर ते दुचाकी घेण्यासाठी आले असता त्यांना त्यांची गाडी दिसली नाही. परिसरात शोध घेतला असता दुचाकीचा तपास लागला नाही. आज शहर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दिली.तसेच चंद्रकात गजानन बोदवडे (२७) हा तरूण शिवाजीनगरातील हुडको परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. गुरूवार दि. १२ रोजी श्री विसर्जन असल्याने त्यांच्या परिसरातील शिवाजीनगर मित्र मंडळाच्या श्री विसर्जन मिरवुणकीत ते सहभागी झाले होते. या मंडळात नाचण्यासाठी चंदक्रात शहरात आले. यावेळी चंद्रकांतने त्याची दुचाकी (एम.एच.१९ सी.जी.३५६७) ही खान्देश कॉम्लेक्स परिसरातील आयडीबीआय बँकेच्या एटीएएमजवळ उभी केली. दुपारी ३.३० वाजता मंडळ नेहरु चौकात पोहचले असता, याठिकाणी चंद्रकात बोदवडे हे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाचण्यास गेले. नाचून झाल्यावर पुन्हा दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले असता, त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. दोन ते तीन दिवसांनंतरही दुचाकीचा शोध न लागल्याने चंद्रकांत बोदवडे यांनी आज शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली.