चायनीज गाडी लावण्यावरून दोन भावांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयटीआय वसतीगृहाच्या भिंतीजवळ चायनीज गाडी लावण्याचा कारणावरून एका चायनीज विक्रेत्यासह त्याच्या भावाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी वस्तूने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी १३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आयटीआय वसतीगृहाच्या भिंतीजवळ काही चायनीज लोक गाड्या लावून आपला व्यवसाय करतात. दरम्यान १३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास विनोद रामा रायपुरे वय-२३, रा. कोल्हे हिल्स, जळगाव व त्याचा भाऊ महेंद्र रायपुरे हे दोघं चायनीज गाडी लावत होते. त्यावेळी विजय गुरखा रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव तसेच त्याच्यासोबत असलेले संभाजी बारी, गोपाल व शंकर नामक व्यक्ती आणि पियुष गुरखा (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. जळगाव या पाच जणांनी येऊन दोघी भावांना शिवीगाळ करत लोखंडी वस्तू मारून दुखापत केली. दरम्यान याप्रकरणी विनोद रायपुरे याने रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे या करीत आहे.

Protected Content