गुढे येथे चोरट्यांकडून घरफोडी; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गुढे येथे मध्यरात्री बंद घरातून ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याच उघडकीला आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संदीप भानुदास पाटील (वय-३१) रा. गुढे ता. भडगाव हे शिक्षक असून आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ते कुटुंबीयांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरात ठेवलेले ५ हजार रुपयांची रोकड, २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगल पोत आणि २० हजार रुपये किमतीचे चांदीचा देवाचा मुकूट आणि बासरी असे एकूण ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कपाटातून चोरून नेले. हा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक निलेश ब्राह्मणकर करीत आहे.

Protected Content