Home क्राईम दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

0
108

वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ-वरणगाव रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता वरूणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राकेश ज्ञानेश्वर तळेले (वय ४४, रा. न्हावी ता. यावल, ह.मु. ओम पार्क भुसावळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विलास पंढरीनाथ फालक हा तरूण रविवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकी (क्र. MH-19-BN-5237) वरून ही भुसावळकडून वरूणगावकडे जात होती. यावेळी वरूणगावकडून भुसावळच्या दिशेने विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकी (क्र. MH-19-CA-4812) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादींच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विलास पंढरीनाथ फालक यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound