Home क्राईम दोन दुचाकींची समोरासमोर भीषण अपघात; चौघेजण जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर भीषण अपघात; चौघेजण जखमी

0
555


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या पाळधी बायपासजवळ मंगळवारी दुपारी दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्या सर्वांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव पिंप्राळा भागातील रहिवाशी असलेले बापुराव महादु पाटील वय ५६ हे आपल्या पत्नीसोबत संगिता बाबुराव पाटील वय ४२ यांच्या सोबत दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी समोरून येणारी दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात पाळधी बायपास जवळ मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला आहे. या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला वय २५ आणि उपरसिंग बरडे बारेला वय २२ दोन्ही रा. मध्यप्रदेश हे दखील जखमी झाले. यातील मगन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound