इंस्टाग्रामवर चॅटिंग करण्याचा जाब विचारण्यावरून दोघांना लोखंडी पाईपने मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इंस्टाग्रामवर मुली सोबत चॅटिंग केल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या मित्राला 4 जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी 17 मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजता घडली आहे. या संदर्भात पहाटे 3 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल घनश्यामदास मान्धवाणी (वय 28 रा.आदर्श नगर जळगाव) हा तर शनिवारी 17 मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याचा मित्र रोहित अशोक मंथान (रा. बाबा नगर सिंधी कॉलनी) याच्यासोबत बाबानगर येथे शाळेसमोर आला होता. त्यावेळी इंस्टाग्रामवर मुली सोबत चॅटिंग करण्याचा जाब विचाराच्या कारणावरून मयूर जावळे, विशाल बाबा राज जावळे आणि भोला (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. नवल कॉलनी जळगाव यांनी हातात लोखंडी पाईप घेऊन अनमोल मंधवाणी आणि रोहित मंथान या दोघांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या हाता पायाला पाठीवर लोखंडी पाईपने मारहाण करून दुखापत करत दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहे