वरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात शुक्रवारी 16 मे रोजी दुपारी 1 वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या एका झाडाच्या खाली शेख वसीम शेख नाशीर (वय 38, रा. रामपेठ वरणगाव) मध्ये गांजाच्या नशा करत असताना वरणगाव पोलिसांनी गुरुवारी 15 मे रोजी रात्री 10 वाजता कारवाई केली. त्याच्याजवळ गांजाची पुडी आणि नशा करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पो.कॉ. फिरोज खान आसिफ खान पठाण यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख वसीम शेख नासिर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अजय निकम करीत आहे.