काव्यरत्नावली चौकातून चोरीच्या दुचाकीसह दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरात चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या तरूणाला दुचाकीसह काव्यरत्नावली चौकातून अटक केली आहे. विधीसंघर्षीत साथिदारालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील काव्यरत्नावली चौकात संशयित आरोपी साहिल खलील खाटीक (वय-२०) रा. अमळनेर हा चोपडा शहर पोलीस ठाण्या दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पो.कॉ. उमेशगिरी गोसावी, पोकॉ हरीष परदेशी यांना संशयित आरोपीला पकडण्यासाठी आज सकाळी रवाना केले. पथकाने संशयित आरोपीला दुचाकीसह काव्यरत्नावली चौकात अटक केली. त्याच्या ताब्यातील दुचाकीची चौकशी केली असता १ महिन्यापुर्वी ही दुचाकी ५ हजार रूपये किंमतीला अमळनेर येथील अल्पवयीन चोरट्याकडून विकत घेतली असल्याचे सांगितले. संशयित दोन्ही चोरट्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून पुढील कारवाईसाठी चोपडा पोलसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

Protected Content