दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दवाखान्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील माहेर आलेल्या हेमांगी अमोल झाकरे (गुजर) यांचा विवाह सुरत येथील डॉ. अमोल दत्तात्रय झाकरे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती अमोल याने दवाखानासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली.

दरम्यान, पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती डॉ. अमोल झांकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Protected Content