तिघ्रे गांजा प्रकरण : संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील तिघ्रे गावात १ कोटी ६ लाख २१ हजारांचा ८८५ किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी संशयित राहूल काशीनाथ सुर्यवंशी (वय-२५, रा. वाडी शेवाळे ता. पाचोरा) याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिघ्रे गावातील मनोज रोहीदास जाधव याच्या घरात सुमारे १ कोटी ६ लाख २१ हजार ४४० रुपयांचा ८८५ किलो गांजा आढळून आला होता. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक जलिंदर अदिपकडे याच्या तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी राहूल काशिनाथ सुर्यवंशी याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयित राहुल सुर्यवंशी यांने जामीनासाठी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश डी. वाय. काळे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज कामकाज झाले असता, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षाकडून सहा. सरकारी वकील ऍड. प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.

Protected Content