गावठी कट्टा व चाकूसह दोघांना अटक; एक फरार

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरात गावठी कट्टयासह चाकू घेऊन फिरणार्‍या दोघांना बाजारपेठ पोलीसांनी अटक केली असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे.

store advt

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील नहाटा चौफुली भागात अजय गोंडाले व त्याचे दोन साथीदार काहीतरी हेतूने त्या परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे,गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी पोना रमण सुरळकर,पोकॉ विकास सातदिवे,पोकॉ ईश्‍वर भालेराव,पोकॉ प्रशांत परदेशी यांनी यासाठी तपासाची चक्रे फिरवली. त्यांना अजय गोंडाले, शुभम पचरवाल, विक्रांत उर्फे विक्की अनिल तायडे राहणार भुसावळ हे दोघेही घासीलाल वडेवाल्यांच्या दुकानजवळ उभे असलेले दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले पोलिसांनी शिताफीने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. यात शुभम पचरवाल जवळून १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व विक्की जवळून चाकू हस्तगत करण्यात आला. दोघांना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असून आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर यातील प्रमुख आरोपी अजय गोंडाले हा आरोपी फरार झाला असून पोलीस पथक शोध घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!