‘त्या’ कंटेनरमधून मुद्देमालाची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकसाठी लागणारे टायर, ट्यूब व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

 

कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण (वय-२७) आणि अमीर शेख नाशिर मण्यार (वय-२०) दोन्ही रा. कजगाव ता. भडगाव जि.जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीचा (MH-१९, CY-२२८१ ) कंटेनर आहे. पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीने त्याचा माल गुहाटी येथे पोहचविण्याचे काम घेतले होते. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी कंटेनरमध्ये कंटेनरचालक सलमान खान सलीम खान पठाण याने पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीतून सुमारे ३ लाख ३६ हजार माल भरून गुहाटीकडे ने रवाना झाला.   फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता कंटनेर घेवून जळगाव कडे येत असतांना तालुक्यातील रामदेववाडी येथील रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला.  सलमान खान सलीम खान पठाण हे अंधार असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबून तिथेच झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून मध्ये ठेवलेला ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले. सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन रामदास साहेबराव खैरनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात न्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलीसांच्या त्यावर संशय बळावला. त्याला खाक्या दाखवताच त्यानेच साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे, हेमंत पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी संशयित आरोपी सलमान खान सलीम खान आणि अमीर शेख नाशिर मण्यार  यांना अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.

Protected Content